*दु:ख होते, फार मोठे, गोठली संवेदना*
*नष्ट झाली, सत्त्व बुध्दी, पेटली ही वेदना*
*तोडल्या तू रक्तगाठी, तोडली तू बंधने*
*मोडल्या तू रीतीभाती, मोडली तू स्पंदने*
*वाढलेल्या अंकुराला, मातीत का गाढले*
*पक्षिणीच्या त्या पिलाने घरटे का सोडले*
*मंदिरी या प्रकाशाच्या, अंधार का दाटला?*
*आंधळ्या या लोचनांना, प्रकाश ना दिसला*
*पर्वताच्या पायथ्याशी, पाय का हो तटला?*
*तुटलेल्या मनामुळे, पाय तेथे रुतला*
*साथ होती सागराची, लाटेला का टाळले?*
*आयुष्याच्या वाटेवरती, प्रेम तू का गाळले?*
*जगणे हे किळसवाणे, तोडली तू वंदना*
*किळसवाण्या जगण्याची, पेटली ही वेदना*
*श्री. विजय पाताडे*
*सहप्रशासक*
*मराठी शिलेदार समूह*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा