सांजवात


सांजवात लाविली रे
तुझ्या मंदिरात
रुप तुझे मी पाहिले
माझ्या पदरात

सांजवातीतून मी रे
तुझ्याशी बोलते
तुझी माझी प्रित बघ
प्रकाशित होते

सांजवातीने रे मला
दिली मोठी आशा
अंधारात पेटताना
नसावी निराशा

सांजवातीचा हा दिवा
अखंड तेवू दे! 
दिव्याच्या या उजेडात
पहाट होवू दे! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा