*सिंधुक्रीडा समूहगान स्पर्धेचे जि .प . अध्यक्ष समिधा नाईक यांच्या हस्ते उद्घाटन*
समूहगान स्पर्धेचे उद्घाटन करताना जि.प. अध्यक्ष
मा.श्री म. समिधा नाईक व शिक्षणाधिकारी मा.श्री.आंबोकर साहेब व मान्यवर
समूहगान स्पर्धेचे उद्घाटन करताना जि.प. अध्यक्ष
मा.श्री म. समिधा नाईक व शिक्षणाधिकारी मा.श्री.आंबोकर साहेब व मान्यवर
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद गेली अनेक वर्षे सातत्याने क्रीडा महोत्सवाचे आयोजन करत आहे. या क्रीडा महोत्सवातून ग्रामीण भागातील अनेक गुणवंत व कलावंत विद्यार्थी निर्माण होत असून हे गुणवंत व कलावंत विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल करत आहेत .यासाठी शिक्षक खूप मेहनत घेताना दिसतात, शिक्षकांचे व शिक्षण विभागाचे योगदान निश्चितच गौरवास पात्र आहे . असे मत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा समिधा नाईक यांनी व्यक्त केले. सिंधुक्रीडा समूहगान स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी समीर नाईक,सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आंबोकर साहेब, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे , समूहगान परीक्षक माधव गावकर ,उदय गोखले कणकवली तालुका गटशिक्षणाधिकारी किंजवडेकर ,शिक्षक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी शिक्षणाधिकारी साहेब यांच्या हस्ते जि.प.अध्यक्ष समिधा नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच समीर नाईक ,समूहगान स्पर्धेचे परीक्षक माधव गावकर व उदय गोखले यांचाही सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष मॅडमांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. समूहगान स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या आनंदोत्सवात सहभाग घेतला.मैदानावर उपस्थित राहून त्यांनी खेळाडूंचे कौतुक केले. या क्रीडा महोत्सवाचे खास आकर्षण ठरलेल्या सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांसह मॅडमांनी फोटोसेशन केले.अध्यक्ष मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद,केलेले कौतुक, मार्गदर्शन आणि फोटोसेशन विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.
या समूहगान स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे आभार उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा