*ये प्रेमपारखी तू प्रेमात रंगलेला*
*राधा तुझी उभी ही तुझ्याच चुंबनाला*
*आकाश चांदण्याने आले फुलून सारे*
*चंद्रास भेटण्याला श्रृंगारली नभी रे*
*घे पारखून चित्र नेत्रात कोरलेले*
*ऐकून शब्द घे हे कंठात दाटलेले*
*भेटीस मी तुझ्या रे आतून सज्ज आहे*
*जाऊ नकोस आता तू दूर दूर मागे*
*भेटीस मी तुझ्या रे आले पुन्हा नव्याने*
*तू प्रेम गीत गा रे पुन्हा नव्या दमाने*
*श्री. विजय पाताडे (सिंधुदुर्ग )*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा