आज बुधवार दि. १ जानेवारी २०२० रोजी बाल-कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाची सांगता झाली. सांगता समारोह थोडासा आवरता झाला. यामुळे मला महोत्सवातील काही बाबींवर बोलायचे होते ते राहून गेले. म्हणून या संदेशाद्वारे माझ्या मनातील भावना आपल्या सर्वांपर्यंत पोचवीत आहे.
मित्रहो! बाल- कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकूण १८ समित्यांच्या स्थापना करण्यात आल्या होत्या. प्रत्येक समितीने आपापले काम चोख बजावले ,त्यामुळे हा महोत्सव सिंधुदुर्गमधील जिल्हा परिषदेच्या मुलांना आनंद देऊन गेला. या प्रत्येक समितीचे प्रमुख व त्यातील सदस्य यांचे मनापासून कौतुक करतो.
पडवे नं.१ शाळेने केलेले संचालन, वेंगुर्ला नं .४ व केंद्रशाळा, साटेली भेडशी, दोडामार्ग या शाळांनी केलेले स्वागतनृत्य यामुळे उदघाटन समारंभ शानदार बनला. या दोन्ही शाळांतील मेहनत घेणारे शिक्षक, मुख्याध्यापक व पालक हे सर्वजण कौतुकास पात्र आहेत. त्यात प्रो. कब्बडी स्टार खेळाडू श्री.सिद्धार्थ देसाई(बाहुबली) यांच्या उपस्थितीने आपल्या मुलांना व शिक्षकांना विशेष प्रेरणा मिळाली व आकर्षण ठरले. यासाठी श्री. शिवाजी गावित, केंद्रप्रमुख यांना मी धन्यवाद देईन.
प्रत्येक मैदानाचे प्रमुख व पंच यांनी वेळेचे बंधन पाळून नियमांमध्ये सामने खेळविले व सर्व स्पर्धा सुरळीत पार पाडल्या. या सर्वांनी सिद्ध केलं की आम्हीही चांगल्या प्रकारे पंचगिरी करू शकतो. सर्व पंच कौतुकास पात्र आहेत.
ज्ञानी मी होणार या दोन्ही टीमचे मी विशेष कौतुक करेन कारण या दोन्ही टीमनी खूप मेहनत घेऊन प्रश्नांनीची निर्मिती केली व ही प्रश्नमंजुषा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली.
समूहगान स्पर्धेत सर्वच संघांनी उत्तम कामगिरी केली. गायन व वादन यामध्ये जिल्हा परिषदेची मुले कुठेच कमी नाहीत हे सिद्ध केलं. विशेष म्हणजे संगीत शिक्षक नसताना अशी तयारी करणं व मुले घडविणे खूप कठीण काम आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. यामागे शिक्षकांनी घेतलेली प्रचंड मेहनत दिसून येते. या मुलांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे गुरुजन यांना सलाम.
समूहनृत्य स्पर्धाही मुलांच्या अप्रतिम अदाकारीने वर्चस्वी ठरल्या. शिक्षकांची मेहनत दिसून येत होती. मुलांचे व शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन!
हे सगळं कागदावर नियोजन करताना खूप सोपं असतं, मात्र त्याची अंमलबजावणी करणं तितकच अवघड असते. यामागे कार्यालयीन कामकाज म्हणजेच प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेणे, शासनाचा एक रुपया खर्च करायचा असेल तरीसुद्धा विहित कार्यालयीन प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असते. यासाठी सभागृहाची मान्यता, वित्त विभागाची मान्यता व सर्वात शेवटी मा. मु का अ यांची मान्यता आवश्यक असते. टेंडर, कोटेशन या प्रक्रिया पूर्ण करणे किचकट असते. यासाठी माझा कार्यालयीन स्टाफ दोन-तीन महिने तयारी करत असतो. हे या महोत्सवात कुठेच समोर येत नाहीत. या माझ्या मुख्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेमध्ये क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण केली म्हणून नियोजित वेळेमध्ये या स्पर्धा पूर्ण होऊ शकल्या. त्यांच्या विशेष मेहनतीचे कौतुक करतो.
मित्रहो! जिल्हा स्तर महोत्सवाची उत्सुकता व विविध आकर्षणे महोत्सवापूर्वीच आपल्या सर्वांच्या समोर ठेवणारे, या महोत्सवातील प्रत्येक क्षण टॅग स्वरूपात आपल्या समोर मांडणारे, या महोत्सवाला प्रसिद्धी देणारे व अतिशय सुंदर शब्दात लेखन व चित्रण करणारे आपल्यातील दोन शिक्षक(हिरे) म्हणजे श्री. मनोहर परब व श्री. विजय पाताडे यांचे मी विशेष आभार मानतो.
भोजन समितीची कामगिरी वाखाणण्याजोगी होती, सुमारे २०००ते २२०० लोकांना एकाच वेळी जेवण वाढणे व याबाबत कोणतीही तक्रार न येणे हे विशेषच आहे. याबद्दल भोजन समितीतील सर्वांचे कौतुक.
या सगळ्यासाठी मला समर्थपणे साथ देणारे व माझी प्रत्येक सूचना सकारात्मक घेऊन स्वयंप्रेरणेने काम करणारे उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे, अधीक्षक श्री. विनायक पिंगुलकर, कनिष्ठ लेखाधिकारी श्री दीपक मेस्त्री, सहायक प्रशासन अधिकारी श्रीम. देवरुखकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. गंगाधर पाटील व श्री. लक्ष्मण डोईफोडे, वरिष्ठ सहायक श्रीम समिधा ठाकूर व कार्यालयीन कर्मचारी.
यासाठी मला सदैव प्रेरणा देणारे मा. संजना सावंत, माजी अध्यक्ष, मा. समिधा नाईक, अध्यक्ष, मा. के. मंजुलक्ष्मी, मु .का .अ, मा. रणजित देसाई, माजी उपाध्यक्ष, मा. राजेंद्र म्हापसेकर, उपाध्यक्ष, मा. डॉ. अनिषा दळवी, सभापती, शिक्षण व आरोग्य समिती यांचे आभार.
यापुढील महोत्सव अधिक उंच, अधिक जलद, अधिक बलवान, अधिक बुद्धिमान बनवू या!!!
श्री. एकनाथ आंबोकर
शिक्षणाधिकारी (प्राथ.)सिंधुदुर्ग

अप्रतिम मांडणी
उत्तर द्याहटवा