*ही पोस्ट लिहिताना अतिव आनंद होत आहे. उद्या सोलापूर येथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते माझा परममित्र दशरथ शिंगारे याचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान होत आहे.हा सोनेरी क्षण शिंगारे गुरुजींना जेवढा आनंददायी आहे, तेवढाच किंबहुना अधिकच माझ्यासाठी आनंददायी आहे.सिंधुभूमीच्या सुपुत्राचा होणारा सत्कार सिंधुदुर्गातील प्रत्येकाला अभिमान वाटावा असाच आहे. शिंगारे गुरुजींचे शैक्षणिक व सामाजिक कार्य तसेच त्यांचं माणूस व शिक्षक म्हणून जगणं मी जवळून पाहिलं आहे. काही काळ आम्ही एकत्र सेवाही केली आहे.*
*वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे गावच्या या सुपुत्राने आपल्या शैक्षणिक कामकाजाची सुरुवात वैभववाडी तालुक्यातील वेंगसरसारख्या दुर्गम भागात केली. त्यानंतर आचिर्णे व लोरे. सध्या ते कुडाळ तालुक्यातील आंबडपाल या शाळेत कार्यरत आहेत. गुणवत्तेचा ध्यास घेतलेल्या शिंगारे गुरुजींनी सेवेच्या सुरुवातीपासून उपक्रमशीलता जोपासत उपक्रमशील शिक्षक हाच खरा आदर्श शिक्षक असतो. हे त्यांनी स्वतःच्या कृतीने सिद्ध केले आहे.समाजसहभाग, शैक्षणिक उठाव, शाळेच्या बोलक्या भिंती, ज्ञानरचनावादी अध्ययन, स्वच्छ सुंदर शाळा, नवोपक्रमशीलता व सर्वांगीण विद्यार्थी विकास ही शिंगारे गुरुजींच्या कार्याची वैशिष्टये म्हणता येतील. त्यांच्या कार्यातील ही वैशिष्टयेच त्यांना कृतिशील बनवत गेली किंबहुना तेच त्यांच ध्येय बनलं. त्याच ध्येयाने प्रेरित होऊन गेली अठरा वर्षे सातत्याने धडपडणारा हा माझा गुणी मित्र म्हणजे शिक्षण क्षेत्रातील ध्येयनिष्ठ अर्जुन!*
*ध्येयावर एकाग्र झालेल्या या अर्जुनाचा शिक्षण क्षेत्रातील एकंदर प्रवासही सर्वांना अभिमान वाटावा असाच आहे. या माझ्या मित्राच्या घरात यापूर्वीच्या पिढीत शिक्षणाची किरणं कधीच पडली नव्हती.कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना हा हिरा शिक्षणाच्या किरणांनी चमकत राहिला.शिकून मोठं होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या या मित्राने वेळप्रसंगी परिस्थितीशी दोन हात करत स्वतःच्या मेहनतीने, जिद्दीने, स्पर्धेच्या युगात स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. केवळ अर्थार्जनासाठी नव्हे, तर सेवेसाठी शिक्षक बनला. सेवाभावी वृत्तीने प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्यरत राहिला. 'शाळेचा सर्वांगीण विकास' हे ब्रीद घेऊन सतत धडपड करीत राहिला. अशा या शाळेसाठी सतत धडपडणा-या ध्येयनिष्ठ सेवाभावी कर्तृत्वाचा उद्या राज्य आदर्श शिक्षक म्हणून गुणगौरव होत आहे. त्यानिमित्त माझ्या या मित्रास व मी पाहिलेल्या शिक्षण क्षेत्रातील ध्येयनिष्ठ अर्जुनास कोटी कोटी शुभेच्छा!*
*श्री. विजय पाताडे*
*मो. नं. ७८७५८२६६०७*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा