जेव्हा मी.....


*जेव्हा मी पशू बनतो*
*तेव्हा...*
*काट्याकुट्यातून स्वैर पळतो*

*जेव्हा मी माणूस बनतो* 
*तेव्हा...*
*रस्त्यावर चालतानाही विचार करतो*

*जेव्हा मी पशू बनतो*
*तेव्हा...*
*जग पेटवण्यासाठी काडी शोधतो*

*जेव्हा मी माणूस बनतो*
*तेव्हा...*
*पेटलेलं जग विझविण्यासाठी पाणी शोधतो*

*जेव्हा मी पशू बनतो*
*तेव्हा...*
*माणसाला गाडण्यासाठी खड्डे खणतो*

*जेव्हा मी माणूस बनतो* 
*तेव्हा...*
*खड्ड्यातला माणूस बाहेर काढतो*

*जेव्हा मी पशू बनतो*
*तेव्हा...*
*मी तिच्यावर बलात्कार करतो*

*जेव्हा मी माणूस बनतो*
*तेव्हा...*
*मी तिची खणा नारळाने ओटी भरतो*

*जेव्हा मी पशू बनतो*
*तेव्हा...*
*मी हे जग माझ्या तीक्ष्ण नखांनी ओरबडतो*

*जेव्हा मी माणूस बनतो* 
*तेव्हा...*
*मी हे जग माझ्या कुंचल्याने रंगवतो*

*जेव्हा मी पशू बनतो*
*तेव्हा...*
*माणसाला संपवण्यासाठी कट रचतो*

*जेव्हा मी माणूस बनतो* 
*तेव्हा...*
*मी साऱ्या जगावरवर प्रेम करतो*

                   *श्री. विजय पाताडे,सिंधुदुर्ग*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा