मित्रहो,सिंधुक्रीडा महोत्सव अधिक रंगतदार व यादगार होण्यासाठी शिक्षणाधिकारी मा. आंबोेकर साहेब व उपशिक्षणाधिकारी मा.आंगणे साहेब यांच्या कल्पनेतून सेल्फी पॉईंट निर्माण करण्यात आला आहे. डॉन बॉस्को स्कूलच्या मैदानावरील स्टेजच्या डाव्या बाजूस असलेल्या या सेल्फी पॉईंटवरून विद्यार्थी, शिक्षक, पालक व क्रीडा रसिकांना मान्यवरांसोबत तसेच मेडलप्राप्त विद्यार्थ्यांसोबत व विजयी संघासोबत सेल्फी घेऊन आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळणार आहे. यावर्षी नव्यानेच क्रीडा महोत्सवात सेल्फी पॉईंटची निर्मिती करण्यात आली असून,हा 'सिंधूक्रीडा सेल्फी पॉईंट' नक्कीच क्रीडा रसिकांचे आकर्षण ठरेल यात शंका नाही.
या सेल्फी पॉईंटचा विद्यार्थी ,शिक्षक, पालक व क्रीडा रसिकांनी आनंद घ्यावा,असे आवाहन शिक्षणाधिकारी मा.आंबोकर साहेब यांनी केले आहे.मात्र या सेल्फी पॉईंटवर फोटो घेताना गर्दी करू नये, तसेच सेल्फी पॉईंटवरील फोटोसेशनमुळे स्पर्धा आयोजनात व्यत्यय येणार नाही,याची दक्षता विद्यार्थी व संघ व्यवस्थापकांनी घ्यावी,असेही त्यांच्याकडून सूचित करण्यात आले आहे.
=====================================
श्री. विजय पाताडे वृत्तांत लेखन समिती प्रमुख

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा