लावणी करू चला..

लावणी करू चला गड्यांनो
शेतावरती चला
आई-बाबांना मदत करूया 
औत धरूया चला

तिरवड्यावर बसू चला रे 
तरवा काढू सटासटा
पेंढी बांधून पाठुंगळीने
तरवा नेऊ पटापटा

औत अमुचे खिल्लारी रे 
नांगर ओढी भराभरा 
पटपट या रे ,भरभर या रे
लावणी करू चला चला

ईरी फाफारी, ईरी फाफारी
चिखल आमचा लय लय भारी
चिखलात आवा लावूया
शेत हिरवं करूया

                    *रचना  - विजय पाताडे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा