सिंधुक्रीडा महोत्सवासाठी क्रीडानगरी सज्ज

*प्रो कबड्डी स्टार खेळाडू  सिद्धार्थ देसाई यांची  उदघाटन सोहळ्यास उपस्थिती*


         सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित  बाल ,कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव यावर्षी डॉन बास्को  स्कूल ओरसच्या   पटांगणावर  दिनांक ३० डिसेंबर २०१९  ते  दिनांक १ जानेवारी  २०२०  या कालावधीत संपन्न होणार आहे. यासाठी  डॉन बास्को स्कूलच्या  भव्य मैदानावर क्रीडानगरी सज्ज झाली असून ,या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा दिनांक ३० डिसेंबर २०१९  रोजी सकाळी ९.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रो कबड्डी स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई उपस्थित राहणार आहेत.
     या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा सदस्य नारायण राणे ,लोकसभा सदस्य विनायक राऊत ,विधानसभा सदस्य दीपक केसरकर, विधानसभा सदस्य नितेश राणे ,विधानसभा सदस्य वैभव नाईक  उपस्थित राहणार आहेत.या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.मंजू लक्ष्मी,सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, वित्त व बांधकाम समिती सभापती जेरोन फर्नांडिस, महिला व बाल विकास समिती सभापती पल्लवी राऊळ, समाज कल्याण समिती सभापती अंकुश जाधव ,शिक्षण समिती सभापती  डॉ.अनिशा दळवी ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे ,शिक्षण समिती सदस्य विष्णुदास कुबल, सुनिल म्हापणकर ,सरोज परब ,उन्नती धुरी,  राजेंद्र म्हापसेकर,संपदा देसाई, राजन मुळीक, कुडाळ पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर ,ओरोस बुद्रुक सरपंच प्रीती देसाई ,डॉन बॉस्को हायस्कूल ओरोसचे मुख्याध्यापक फादर जॉनाथन रिबेरो आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
      तीन दिवस चालणा-या या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी मोठ्या गटाच्या सांघिक व वैयक्तिक स्पर्धा तसेच लहान व मोठ्या गटाच्या ज्ञानी मी होणार या स्पर्धा होतील.क्रीडा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी लहान गटाच्या सांघिक व वैयक्तिक स्पर्धा तसेच लहान व मोठ्या गटातील समूहगान स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत,तर क्रीडा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लहान व मोठ्या गटाच्या समूहनृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत. दिवसभरात झालेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण त्याच दिवशी स्पर्धा पूर्ण झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 
       हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी आंबोकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे . त्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून, सुमारे दोनशेहून अधिक शिक्षक व कर्मचारी व्यवस्थापक, सामना प्रमुख, पंच, परीक्षक म्हणून कामकाज पाहणार आहेत.
=====================================
                      श्री. विजय पाताडे, वृत्तांकन समिती प्रमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा