*गझल स्पर्धेसाठी*
*दिनांक - २४ मार्च २०१८*
*वृत्त- कालगंगा*
*हर व ले ल्या पा ख रा ला शो ध ते चो हि क डे*
*गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा*
*२ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २ १ २*
*----------------------------------------------------------------*
*हरवलेलं पाखरू*
*हरवलेल्या पाखराला शोधते चोहिकडे*
*ठाव नाही, गाव नाही, पाय माझे टेकले*
*लागता चाहूल तुझी, बांधले मी घरटे*
*बांधताना, घरटे मी, स्वप्न होते पाहिले*
*बाळ माझे, उंच जावे, विश्व त्याने पाहवे*
*मारुतीचं बळ त्याच्या, पंखालाही लाभु दे*
*शोधण्या तू, वाट तुझी, सोडले तू घरटे*
*सूर्य होता, चंद्र होता, सोबतीला पंख रे*
*खात्री देते, मी तुझी रे, ध्येय तू तर गाठले*
*परतीच्या प्रवासाचे, पंख कोणी काटले*
*घरट्याने तुझ्यासाठी, खूप होते सोसले*
*ऊन वारा, थंड गारा, नाही त्याला बोचले*
*पाहतो तो, तुझी वाट, मुका तुझा बाप रे*
*घरट्याला वियोगाचा, का? असे हा शाप रे*
*श्री. विजय पाताडे*
*मु. पो. फोंडाघाट, ता- कणकवली*
* जि- सिंधुदुर्ग, मो. नं. 7875826607*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा