(अष्टाक्षरी रचना)
बीज अंकुरे अंकुरे
त्याला मातीत पेरले
माझ्या तान्ह्याबाळापरि
पाणी त्याला मी पाजले
बीज अंकुरे अंकुरे
त्याला किती छान तुरे
वा-यावर तुरा डुले
मन मनातच बोले
बीज अंकुरे अंकुरे
फुल फांदीत फुलले
परिमळ उधळीत
सारं शिवार डोलले
बीज अंकुरे अंकुरे
उद्याचेच ते रे सोने
भुकेलेल्या पाखरांना
तेच देईल रे दाणे
विजय पाताडे
सिंधुदुर्ग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा