सामान्यज्ञान भाग -११

*शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी सुरू केलेल्या सोन्याच्या नाण्यांना काय म्हणतात?
होन
*शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी सुरू केलेल्या तांब्याच्या नाण्यांना काय म्हणतात?
शिवराई
*बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला?
छत्रपती संभाजी महाराज
*पुरंदरचा तह कोणत्या साली झाला?
सन1665
*शिवाजी महाराजांनी तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक कोणत्या विद्वान पंडिताच्या मार्गदर्शनाखाली करून घेतला?
निश्चलपुरी गोसावी
*वनस्पती प्रकाश संश्लेषणात प्रकाश ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत करतात?
रासायनिक ऊर्जेत
*वनस्पती प्रकाश संश्लेषणात हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात?
कार्बन डाय-ऑक्साइड
*वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत  कोणता वायू हवेत सोडतात?
ऑक्सिजन
*जेव्हा प्रकाश किरण हवेतील सूक्ष्म कणांवर पडतात ,तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात?
*प्रकाशाचे विकिरण
जेव्हा हवेचे तापमान कमी होते ,तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता.......... होते.     ( कमी/अधिक)
कमी
*घनतेचे एकक कोणते?
ग्रॅम प्रति घनसेमी
*ज्या पदार्थात द्राव्य  विरघळते त्याला काय म्हणतात?
द्रावक
*वाळूचे कण कोणत्या खनिजांचे बनलेले असतात?
सिलिकॉन डाय-ऑक्साइड
*कोणत्या मृदेत मोठ्या कणांचे प्रमाण अधिक असते?
रेताड  मृदा
*कोणत्या मृदेत सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वाधिक असते?
चिकन  मृदा
*सौंदर्यप्रसाधनात कोणती माती वापरली जाते?
मुलतानी माती
*सजावटीच्या वस्तू बनविण्यासाठी कोणत्या मातीचा वापर करतात?
टेराकोटा मृदा
*मूर्ती बनविण्यासाठी कोणत्या मृदेचा वापर करतात?
शाडूची मृदा
*कपबशा बनविण्यासाठी कोणत्या मृदेचा वापर करतात?
चिनी मृदा
*जागतिक मृदा दिन केव्हा साजरा केला जातो?
5 डिसेंबर
*ड्रॉसेरा बर्मानी या कीटकभक्षी वनस्पतीचा शोध कोणी लावला?
जोहान्स बर्मन
*वनस्पतीमध्ये प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या पोषक द्रव्याचे नाव काय?
फॉस्फरस
*जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून कोणता दिवस मानला जातो?
16 ऑक्टोबर
*दुधाचे पाश्चरीकरण करण्यासाठी ते किती अंश सेल्सिअला  पंधरा मिनिटे तापविले जाते?
80 ℃
*किती साली लोकसभेने अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा संमत केला?
सन 1954

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा